Ad will apear here
Next
भेद्य अभेद्य
उषा पुरोहित यांची ही सामाजिक कादंबरी आहे. शहरी मध्यमवर्गीय संस्कृती, जीवन कादंबरीतून समोर येते. स्वातंत्र्यपूर्व आणि तत्कालिक स्वातंत्र्योत्तर काळही दिसतो. ‘भेद्य आहेत त्या माणसा-माणसांमध्ये उभ्या केलेल्या भिंती आणि अभेद्य आहेत त्या त्या समाजपुरुषाला कुटिलतेने अपमानित करणाऱ्या विषप्रवृत्ती’, असे लेखिका प्रस्तावनेत म्हणतात.

या संकल्पनेवर आधारितच ही कथा आहे. एक बाजूला विचारी व उदारमतवादी सवर्ण आणि त्याने पोटच्या पोरासारखा वाढवलेला मांगाचा मुलगा गणेश आणि त्याची बुद्धिमान आणि संतांचे शहाणपण अंगी असलेली आहे आहेत.

दुसऱ्या बाजूला स्वार्थी, अनीतिमान आणि पदासाठी सवर्णेतर मुलीचा उपयोग करून घेणारा सवर्ण आहे. तिसऱ्या बाजूला मुलीचा पिता आहे. या त्रिकोणावर कादंबरीचा पाया आहे.

प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन
पाने : २२५
किंमत : ३०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRUBH
Similar Posts
ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी सकाळी पोटभर ब्रेकफास्ट करून कामाला सुरुवात केली, तर त्यातून मिळालेली ऊर्जा दिवसभर पुरते. ब्रेकफास्टप्रमाणेच अलीकडे लोकप्रिय ठरलेला प्रकार म्हणजे ब्रंच. म्हणजे ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण एकत्र करून ब्रंच करायचा पण हे सगळे प्रकार चविष्ट तर हवेतच, शिवाय पौष्टिकही हवेत. उषा पुरोहित यांनी असे पदार्थ कसे करायचे हे टिप्ससह सांगितले आहे
नागवेल ‘नागवेल’ कादंबरीचा परिचय...
नोबेल विजेता विनोद मोहिते आणि त्याची प्रेयसी विशाखा आपटे या दोघांभोवती फिरणारी ही उत्तम कदम यांची कादंबरी आहे. कादंबरीच्या प्रारंभीच वधस्तंभाकडे जाणारा धीरोदात्त नायक विनोद मोहिते समोर येतो मात्र, चमत्कार घडावा तशी त्याची फाशीची शिक्षा रद्द होते. फाशी रद्द होण्याचे कारण काय, मुळात त्याला फाशीची शिक्षा होण्याचे कारण काय, या सगळ्याची उत्तरे कादंबरीतून मिळतात
यसन ‘यसन’ म्हणजे बैलाच्या नाकात घातलेली दोरी. याचे नियंत्रण गाडीवानाकडे असते. अशा अनेक ‘यसनी’ माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतात. यामुळे त्याचे जीवन कचाट्यात सापडते, असे कथन करीत ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी ‘यसन’ या कादंबरीतून ऊसतोडणी मजुरांचे ‘जीणं’ उभे केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language